पाच वर्षात मोदींनी जे करून दाखवले ते काँग्रेसला साठ वर्षात जमले नाही: मुख्यमंत्री फडणवीस.

Foto
औरंगाबाद:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांसाठी राबविलेल्या अनेक योजनांमुळे देशातील जनतेत एक प्रकारे विश्वासाची भावना निर्माण झाली असून काँग्रेसला साठ वर्षात जे जमले नाही ते आम्ही पाच वर्षात करून दाखवले. काँग्रेस तीन पिढ्यांपासून गरिबी हटाव च्या घोषणा देते. मात्र, तरीही देशातील गरिबी हटली नाही. गरिबी हटली ती काँग्रेसच्या चेल्याचपाट्यांची अशा तिखट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काल गारखेडा परिसरात शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाली या सभेत ते बोलत होते. 

राहुल गांधी यांच्या न्याय योजनेचा देखील मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान मोदी  काळया पैशावर कारवाई करून देशाची तिजोरी भरत आहेत तर राहुल गांधी यांना हि तिजोरी खाली करायची आहे. राष्ट्रहिताच्या विचार कोण करत ते ओळखा आणि देशद्रोह्यांना पाठिंबा कोण देते हेदेखल ध्यानात ठेवा. देश सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहू त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा विचार करून मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. मोदींनी प्रत्येक योजनेचा पैसे थेट गरिबांच्या खात्यात जमा केला. त्यात कुठल्याही दलाला घुसू दिले नाही त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मोदींवर चिडले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात मोदी निर्णायक लढाई लढत असून या लढाईत त्यांना तुमची साथ हवी आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला खैरे यांचे हात बळकट करायचे आहेत असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. 

यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन, आ. अतुल सावे,आ. संजय सिरसाठ, आ. प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्ह्यापरिषद अध्यक्ष, देवयानी डोणगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर भगवान घडामोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शहर प्रमुख विशवनाथ स्वामी, स्थायी समितेचे सभापती राजू वैद्य, रिपाईचे नेते बाबुराव कदम यांच्यासह अंक पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.   

औरंगाबादच्या विकासाठी केले प्रयत्न 
औरंगाबाद शहरच्या विकासासाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार नेहमीच पाठीशी उभे राहिले असून औरंगाबाद  मधील रस्त्यांसाठी आम्ही १२५ कोटी रुपये दिले, सिंचनासाठी २५०० कोटी रुपये दिले, डीएमआयसी च्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळत असून ११००० कोटी रुपयांची गुंतवणूक यामध्ये होत आहे. समृद्धी महामार्ग हा राज्याचे भाग्य पालटणार प्रकल्प आहे. यामुळे देखील लाखो लोकांना रोज़गर मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले  आपल्या  भाषणात सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker